• Artificial Intelligence (AI) – कृत्रिम बुद्धिमत्ता •

Artificial Intelligence (AI) हा एक शब्द नसून हा एक बदल आहे. येणारे २१  वे  शतक हे फक्त Artificial Intelligence तंत्रज्ञानाचे  लक्षात ठेवले जाईल. Artificial Intelligence तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. कारण तेव्हा Artificial Intelligence चा वापर करून  अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात.

परंतु जास्त लोकांना Artificial Intelligence (AI) हे काय आहे ? हे माहित नाहीये. Artificial Intelligence चा वापर कुठे आणि कसा केला जातो, त्याचा उपयोग काय आहे ?  ह्या बद्दल कमी प्रमाणात माहिती आहे. म्हणून आज पासून आंपण Artificial Intelligence  बद्दल थोडी थोडी करून प्रत्येक ब्लोग मध्ये माहिती जाणून घेणार  आहोत.https://mr.wikipedia.org/

अनुक्रमणिका-

  • Artificial Intelligence म्हणजे काय ?
  • Artificial Intelligence चा  इतिहास
  • Artificial Intelligence ची वैशिष्टे
  • Artificial Intelligence चा उपयोग

           शिक्षण व्यवस्था  (Education System)

           आरोग्य  सेवा क्षेत्र (Healthcare Sector)

            वित्त क्षेत्र  (Finance Sector)

           उत्पादन  (Manufacturing)

 

Artificial Intelligence म्हणजे काय ?

कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) म्हणजे मानवी बुद्धीमत्तेसारखी अनुभवातून  शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालवणाऱ्या सोफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये आणने होय. कृत्रिम बुद्धिमत्ता हि कॉम्पुटर सायन्स, भाषा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक विषयांनी तयार होते.

Artificial Intelligence (AI) म्हणजे  मनुष्याची विचार करण्याची शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता एका मशीन मध्ये बसवणे किवा सोफ्टवेअर  मध्ये टाकणे किवा प्रोगाम मध्ये टाकणे. Artificial Intelligence या शब्दाची फोड केली तर  Artificial या शब्दाचा अर्थ होतो कृत्रिम ( मनुष्यद्वारे तयार केलेला ) आणि Intelligence या शब्दाचा  अर्थ होतो बुद्धिमत्ता     ( विचार करण्याची शक्ती )  आपल्या बोली भाषेत सांगायचे झाले तर कृत्रिम बुद्धिमत्ता हि वास्तव बुद्धिमत्तेची जशीच्या तशी नक्कल किवा नक्कल करायचा केलेला एक यशस्वी प्रयन्त आहे.

 

Artificial Intelligence  चा जन्म : १९५०-१९५६ दरम्यान

Artificial Intelligence  चा जनक  : जॉन मँककार्थी  (JON MCCARTHY)

 

Artificial Intelligence चा  इतिहास :-

जॉन मँककार्थी  (JON MCCARTHY) या अमेरिकन कॉम्पुटर सायटिस्टने १९५५  मध्ये प्रथम AI चा शब्दप्रयोग केला आणि १९५६ मध्ये एका कॉन्फरन्समध्ये जॉन मँककार्थी  (JON MCCARTHY) यांनी AI बद्दल घोषणा  केली  आणि तेव्हापासून त्याच्यावर विचारसरणी सुरु झाली.

 

Artificial Intelligence ची वैशिष्टे:-

            कृत्रिम  बुद्धिमत्तेचे एक वैशिष्टे म्हणजे ते मनुष्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेची नक्कल करू शकते किवा त्याचे अनुकरण करू शकते कारण ते मानवाद्वारे घेतलेले निर्णय म्हणून आज्ञा लागू  करू शकते Artificial Intelligence हे तंत्रज्ञान कॉम्पुटर सायन्सचीच एक शाखा आहे. यामध्ये मशीन संगणक प्रणालीद्वारे मनुष्याच्या बुद्धिमत्तेची नक्कल करते जसे मनुष्यासारखे विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, एकमेकांशी संवाद साधने, वाचू शकणे, निर्णय घेणे इत्यादी गोष्टी सहज करू शकते

 

Artificial Intelligence चा उपयोग:-

            जर तुम्हाला अस वाटत असेल कि Artificial Intelligence चे उपयोग फक्त Robotics मधेच होतो अस काही नसून तर त्याचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात केला  जातोय. त्याची काही उदाहरणे खाली पाहूया.

 

  • शिक्षण व्यवस्था (Education System)

शिक्षण क्षेत्रात Artificial Intelligence चा भरपूर उपयोग होतो Online Exam पासून  ते Automated Grading System पर्यंत सगळीकडे Artificial Intelligence चा  उपयोग केला जातो. फक्त एवढेच पुरेसे नाही कारण एकाच वर्गातील मुले एकसारखी नसतात. काही खूपच Intelligent असतात तर काही  एवरेज असतात. अशात प्रत्येक विध्याथ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिक्षण मिळायला पाहिजे, परंतु आपल्या सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत अशी व्यवस्था नाही. त्यामुळे आजकाल online education वर जास्त जोर दिला जातो कारण याच्यात Artificial Intelligence च्या मदतीने smart व personalized content उपलब्द करून दिला जातो. आणि त्याच्या बरोबर student च्या अभ्यासातल्या शंका, अडचणी सोडवल्या जातात.

 

  • आरोग्य सेवा क्षेत्र (Healthcare Sector)

आजकाल अशी यंत्रे / मशीन आल्या आहेत कि त्या मानवाच्या शरीराच्या आत जाऊन रोगांचे निदान करतात. Artificial Intelligence  मुळे Healthcare Sector मध्ये नवीन क्रांती आली आहे. आज रोबोटची मदत घेऊन सर्जरी केली जाते शरीराच्या आत लहान लहान रोबोट सोडून आसाद्य रोगाचा उपचार केला जातो. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर Healthcare Sector साठी Artificial Intelligence हे एक वरदानच ठरेल.

 

  • वित्त क्षेत्र (Finance Sector)

वित्त क्षेत्रमध्ये Data Analysis आणि personalized Report तयार करण्यासाठी Artificial Intelligence चा उपयोग केला जातो. जास्तकरून Automation आणि Predictive Analysis मध्ये Artificial Intelligence जास्त उपयोगी पडते. बँका, फायनान्स Institute  हे आपले कामकाज सोपे करण्यासाटी Artificial Intelligence चा उपयोग करतात. तसेच बँका नवीन खाते उघडण्यासाठी, प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी, ग्राहकांकडून Feedback घेण्यासाठी Chatbots चा उपयोग करतात जे कि Artificial Intelligence च्या मदतीने काम करते.

 

  • उत्पादन (Manufacturing)

निर्माण उद्योगात सर्वात जास्त श्रम आणि वेळेची गरज पडते, त्यामुळे ह्या क्षेत्रात Artificial Intelligence चा वापर जास्त प्रमाणात होतो. ह्याच्यामुळे फक्त वेळ, श्रम आणि उर्जा यांचीच बचत होत नाही तर पैशांची हि बचत होते. त्यामुळे आजकाल Manufacturing Industry मध्ये जादातर काम मशीन्स वर चालते. ह्या अगोदरही मशीनचा उपयोग होत होता पण ज्यादातर मशीन्स ह्या Manually Operate कराव्या लागत होत्या. परंतु आता मशीन्स Automatic झाल्या आहेत ज्या मानवाशिवाय काम करू  शकतात.

अशा प्रकारे Artificial Intelligence चे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे उपयोग आहेत. त्यातील उदाहरण म्हणून काहींची माहिती वर पहिली अशाच प्रकारे अजून खूप क्षेत्र आहेत ज्यामध्ये Artificial Intelligence चा उपयोग केला  जातो.

 

निष्कर्ष

मित्रानो, आशा प्रकारे आपण या लेखात Artificial Intelligence कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? त्याचा उपयोग, कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास  या विषयी माहिती बघितली, Artificial Intelligence मध्ये मानवाच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान जसे जसे पुढे जात राहील.तसे Artificial Intelligence च्या क्षेत्रात अनेक संधी उपलबद्ध होत जातील. मानवाच्या जगण्यात नवीन क्रांती येयील.

आपल्याला हा लेख कसा  वाटला तो कमेंट बॉक्स  मध्ये  लिहून जरूर कळवा,

आपला मौल्यवान वेळ खर्चून हा लेख वाचला त्याबद्दल खूप धन्यवाद।

आभारी आहे।